breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

चेन्नईने बिघडवला स्वत:चा खेळ, कसं आहे प्लेऑफचं गणित?

IPL 2024 | काल झालेला गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्या चेन्नई सुपर किंग्जला ३५ धावांनी पराभूत व्हावं लागलं. या सामन्यात गुजरातने चेन्नईला हरवून आधीच्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतला आणि त्यासोबतच प्लेऑफच्या आशाही जिवंत ठेवल्या.

चेन्नईला मात्र पराभवाने दणका बसला असून प्लेऑफच्या शर्यतीत अडथळा निर्माण झाला आहे. चेन्नईच्या या पराभवाने चार संघांना दिलासा मिळाला असून त्यांना आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी निर्माण झाला आहे.

कसं आहे प्लेऑफचं गणित?

चेन्नई सुपर किंग्जचे आता दोन सामने उरले असून यातील एका सामन्यात जरी ते पराभूत झाले तरी ते स्पर्धेतून बाहेर पडतील. चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला असला तरी ते पॉइंट टेबलमध्ये टॉप ४ मध्ये आहेत.

हेही वाचा     –      ‘अब की बार जनता भाजपला तडीपार करणार’; आदित्य ठाकरे 

मात्र त्यांच्या पराभवाने दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्या आशा जिवंत झाल्या आहेत. ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत.

गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर आता चेन्नई जास्ती जास्त १६ पॉइंट मिळवू शकते. चेन्नईशिवाय दिल्ली आणि लखनऊसुद्धा १६ पॉइंटपर्यंत पोहोचू शकते. पण लीग स्टेजला या दोन्ही संघात एकमेकांविरुद्ध सामना होणार असल्याने कोणता तरी एक संघ १६ पॉइंट मिळवू शकतो.

जर पुढच्या सामन्यात तीन्ही संघांनी एक जरी सामना गमावला तरी ते १४ पॉइंटच मिळवू शकतील. त्यामुळे आरसीबी आणि गुजरात टायटन्स हे प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जास्त आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button